मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात युवासेनेचे अध्यक्ष व शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेही उतरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान निवडणुकीच्या राजकारणापासून मी स्वत:ला कधीही दूर ठेवलेले नाही. गरज असेल तेव्हा मी लढेनही. लोकप्रतिनिधी म्हणून मोठे काम करता येऊ शकते. माझे आजोबा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे वा माझे वडील उद्धव ठाकरे यांनी कधीही निवडणूक लढविली नाही पण, त्यांनी कुटुंबातील इतरांवर ते मत कधीही लादलेले नव्हते, असं यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता ते लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान या मतदारसंघात भाजपाच्या पूनम महाजन विद्यमान खासदार आहेत. ही जागा आदित्य यांच्यासाठी अधिक सुरक्षित असल्याचे मानले जाते. परंतु शिवसेनेने आदित्य यांच्यासाठी मुंबई उत्तर-मध्यची जागा मागितली तर त्यांनी मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून लढावे, असे भाजपाकडून सुचविले जाऊ शकते. उत्तर-पश्चिममध्ये शिवसेनेचे गजानन कीर्तिकर विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे या दोन्हीपैकी एका मतदारसंघातून आदित्य ठाकरे हे निवडणुकीच्यी मैदानात उतरतूल अशी शक्यता आहे.
COMMENTS