मुंबई – अपेक्षेप्रमाणे शिवसेनेच्या नेतेपदी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंची वर्णी लागलेली आहे.त्याचबरोबर एकनाथ शिंदे, चंद्रकात खैरे, अनंत गीते, आनंदराव अडसूळ यांचीही नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर मिलिंद नार्वेकर यांची शिवसेनेच्या सचिवपदी वर्णी लागली आहे. तसेच शिवसेनेचे नेते मनोहर जोशी आणि सुधीर जोशी यांचे नेतेपद कायम ठेवण्यात आले आहे. वरळी येथील एनएसआयसीच्या पटांगणावर पार पडलेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आदित्य यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
दरम्यान आज झालेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षांतर्गत मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्या नावाची शिवसेना नेतेपदासाठी निवड झाल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर संपूर्ण सभागृहात जल्लोष झाला असल्याचं पहावयास मिळालं. सध्या शिवसेनेत ८ नेते तर ३१ उपनेते आहेत. आदित्य ठाकरे सोडून कोणालाही नेतेपद नको, अशी मागणी शिवसेनेतील एका गटाने केली होती.
COMMENTS