अगरतळा – त्रिपुरामध्ये तब्बल २५ वर्षानंतर सत्तांतर झालं असून या राज्यात भाजपनं एकहाती सत्ता मिळवली आहे. भाजपनं आज सत्ता स्थापन केली असून भाजपचे तरुण नेते म्हणून ओळख असलेले बिल्पब देव यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर जीष्णू देबबर्मा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या शाही शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह केंद्रातले बडे मंत्री उपस्थित होते.
Agartala: #BiplabDeb takes oath as the next Chief Minister of #Tripura pic.twitter.com/yjfqx5m88B
— ANI (@ANI) March 9, 2018
दरम्यान त्रिपुरात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं असून स्थानिक पक्ष आयपीएफटीच्या साथीनं भाजपनं हे बहुमत मिळवलं आहे. त्यामुळे या पक्षाचे आमदाराही मंत्रिमंडळात सामील झाले आहेत. तसेच या शपथविधी सोहळ्याला भाजपनं त्रिपुरातही जोरदार शक्तिप्रदर्शन केलं असून देशातील सर्व राज्यातील भाजपशासित मुख्यमंत्र्यांना या निमंत्रण देण्यात आलं होतं. तसेच देशभरातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.
COMMENTS