अहमदनगर – जामखेड पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री मोरे यांची सभापती पदी निवड झाली आहे. भाजपच्या मनीषा सुरवसे आणि राष्ट्रवादीच्या राजश्री मोरे यांना समसमान मते पडली होती. त्यामुळे चिठ्ठी काढून
सभापतीपदाची निवड करण्यात आली आहे. चिठ्ठीच्या निवडीत राष्ट्रवादीला यश मिळालं असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री मोरे यांची सभापतीपदी निवड झाली आहे.
दरम्यान आज झालेल्या निवडीमुळे दहा महिन्यानंतर रिक्त सभापती पदाला न्याय मिळाला आहे. जामखेड पंचायत समिती सभापती पदासाठी ३ जुलै रोजी प्रक्रिया झाली होती. परंत उच्च न्यायालयाने मतमोजणी करण्यास स्थगिती दिली होती. सदर स्थगिती उठवल्यानंतर आज पंचायत समिती सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी मतमोजणी करण्यात आली असता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री मोरे व भाजपच्या मनीषा सुरवसे यांना समसमान मते मिळाली.
त्यामुळे चिठ्ठीवर निवड करण्याचे निवडणूक अधिकारी नष्टे यांनी जाहीर केले. त्यानंतर चिठ्ठीच्या निवडीत राष्ट्रवादीला यश मिळालं असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री मोरे यांची सभापतीपदी निवड झाली आहे. या निवडीनंतर आमदार रोहीत पवार यांनी राजश्री मोरे यांचा सत्कार करत त्यांचं अभिनंदन केलं आहे.
COMMENTS