“आमचंही ठरलय विखे, थोरात, ससाणे यांच्याशी गद्दारी करणाय्रा आमदाराला पाडायचं!”

“आमचंही ठरलय विखे, थोरात, ससाणे यांच्याशी गद्दारी करणाय्रा आमदाराला पाडायचं!”

शिर्डी – विधानसभा निवडणुकीआधीच श्रीरामपुरातील राजकीय वातवरण तापण्यास सुरुवात झाली असल्याचं दिसत आहे. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्याविरोधात शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे.
,आमचही ठरलय विखे, थोरात, ससाणे यांच्याशी गद्दारी करणाय्राला पाडायच अशा मजुकराचे फलक शहरात लावण्यात आले आहेत. त्यामुळे श्रीरामपुरातील राजकीय वातवरण आता चांगलच तापण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुक काँग्रेसच्या तिकीटावर लढवलेल्या कांबळेंनी आता शिवसेनेत प्रवेश केला आहे. कांबळेच्या पक्षबदलाबद्दल मतदारसंघात नाराजी आहे. विशेष म्हणजे कांबळे यांना शिवसेनेत प्रवेश दिल्याने शिवसैनिकही नाराज आहेत. त्यामुळे भाऊसाहेब कांबळे यांना सगळ्या गटांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान विखे पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून भाऊसाहेब कांबळे यांची ओळख होती. विखे पाटील यांनी यावेळी लोकसभेची काँग्रेसची उमेदवारीही त्यांना दिली होती. मात्र, सुजय विखे यांच्या जागावाटपाच्या आणि भाजपा प्रवेशाच्या घडामोडीमुळे विखे पाटील यांनी कांबळे यांना थांबण्याचा सल्ला दिला होता. परंतु कांबळे यांनी विखेंचे विरोधक असलेल्या बाळासाहेब थोरात यांचा हात धरला आणी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली. या लोकसभा निवडणुकीत भाऊसाहेब कांबळे यांचा दारूण पराभव झाला. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS