नगर निवडणूक – श्रीपाद छिंदम पुन्हा निवडणुकीच्या मैदानात, छिंदमविरोधात कोण लढणार ?

नगर निवडणूक – श्रीपाद छिंदम पुन्हा निवडणुकीच्या मैदानात, छिंदमविरोधात कोण लढणार ?

अहमदनगर – छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द उच्चारणारा नगर मनपातील भाजपचा वादग्रस्त माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. छिंदमने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सर्जेपुरा-बागडपट्टी-दिल्लीगेट या परिसराच्या प्रभाग ९ मधील ‘क’ या सर्वसाधारण जागेसाठी त्याने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या प्रभागात त्याच्या पद्मशाली समाजाचे मोठे मतदान असून या हक्काच्या मतदानाच्या आशेने त्याने उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान मनपा कर्मचाऱ्यांशी फोनवरुन बोलताना छिंदमने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द उच्चारले होते. त्यामुळे राज्यभरातील शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला होता. ८-९ महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेचे पडसाद अजूनही उमटत आहेत. असे असतानाही त्याने पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप व काँग्रेसकडून कोणाला उभे केले जाते याची उत्सुकता लागली आहे.

 

COMMENTS