अहमदनगरमधील राष्ट्रवादीच्या ‘त्या’ 18 नगरसेवकांवर जयंत पाटील यांची कारवाई !

अहमदनगरमधील राष्ट्रवादीच्या ‘त्या’ 18 नगरसेवकांवर जयंत पाटील यांची कारवाई !

मुंबई – अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पक्षाचा आदेश डावलून भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. या नगरसेवकांवर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कारवाई केली आहे. या १८ नगरसेवकांना पक्षातून बडतर्फ करण्याची कारवाई  करण्यात आली आहे. त्यामुळे या नगरसेवकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

दरम्यान पक्षादेश न पाळता अहमदनगरमधील महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडून सर्व १८ नगरसेवकांसह शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. खुलासा केला नाही तर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता. परंतु या सर्व नगरसवकांनी अद्याप कोणताही खुलासा केला नसल्यामुळे त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलं असल्याचं पत्र जयंत पाटील यांनी पाठवलं आहे.

COMMENTS