अहमदनगर – राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रीपद दिल्यानंतर आता भाजपकडून विखे यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री सध्या भाजप आमदार राम शिंदे आहेत. परंतु आता राम शिंदे यांच्याकडील पालकमंत्रिपद राधाकृष्ण विखे यांना दिलं जाणार असल्याची चर्चा आहे.त्यामुळे अहमदनगरच्या पालकमंत्रिपदासाठी राम शिंदेंना नवे स्पर्धक मिळाले असल्याची चर्चा आहे. परंतु नगरच्या पालकमंत्रिपदाबाबत भाजपकडून अद्याप कोणतंही अधिकृत भाष्य करण्यात आलेलं नाही. त्यामुळे याबाबत भाजप काय निर्णय घेणार हे पाहण गरजेचं आहे.
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत कर्जत मतदारसंघातून राष्ट्रवादीचे युवा नेते आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे राम शिंदे यांच्या विरोधात उतरतील अशी चर्चा आहे.त्यामुळे विधानसभेत रोहित पवार यांच्या रुपाने तर आता पालकमंत्रिपदासाठी शिंदे यांना विखेंच्या रुपाने नवे स्पर्धक मिळाले असल्याचं बोललं जात आहे.
COMMENTS