अहमदनगर – अहमदनगरमध्ये महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांनी भाजपाला साथ दिली आहे. त्यामुळे भाजपचा या निवडणुकीत विजय झाला आहे. राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांनी पक्षश्रेष्ठींचे आदेश धुडकावत भाजपाला साथ दिली आहे. त्यामुळे या नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यास संबंधित नगरसेवकांचं पक्षातून निलंबन करण्यात येणार असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या नगरसेवकांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचं दिसत आहे.
पक्षाचा आदेश न जुमानणाऱ्यांविरोधात आम्ही शो कॉज नोटीस काढली आहे. पक्षपातळीवर या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. सत्तेचा हा नगर पॅटर्न वेळीच ठेचला जाईल. – प्रदेशाध्यक्ष @Jayant_R_Patil (3/3) pic.twitter.com/evJpGNiiVi
— NCP (@NCPspeaks) December 28, 2018
महापालिकेत एकूण 68 जागा असून बहुमतासाठी 35 चे संख्याबळ आवश्यक होते. यासाठी राष्ट्रवादी आणि इतर पक्षांनी भाजपला पाठिंबा दर्शवल्यामुळे भाजपचं संख्याबळ एकूण 37 झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचे बाबासाहेब वाकळे हे महापौरपदावर विराजमान झाले आहेत. परंतु भाजपला साथ देणा-या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना मात्र पक्षनेतृत्वानं नोटीस बजावली आहे. त्यामुळे या नगरसेवकांच्या अडचणीत आता वाढ झाली असल्याचं दिसत आहे.
COMMENTS