राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या !

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या !

अहमदनगर अहमदनगरमध्ये हत्याकांडाचं सत्र सुरुच असल्याचं दिसून येत आहे. शिवसेना कार्यकर्त्यांच्या हत्याकांडाचं प्रकरण ताज असतानाच आता आणखी एक घटना घडली आहे. जामखेडमधील राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. गोळीबारात 30 वर्षीय योगेश आणि 25 वर्षीय राकेश राळेभात यांचा मृत्यू झाला आहे. योगेश राळेभात हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस संघटनेचा जिल्हा सरचिटणीस होता. अज्ञातांनी या दोघांवर गोळीबार केला असून याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान मार्केट यार्ड परिसरात ही घटना घडली असून दोघांनीही तोंडाला कापड गुंडाळल्यामुळे त्यांची ओळख पटलेली नाही. गोळीबारानंतर दोघे आरोपी फरार झाले आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं असल्याचं पहावयास मिळत असून नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे.

COMMENTS