पंकजाताईंनी आयत्या पिठावर रेघोट्या मारने बंद करावे – अजय मुंडे

पंकजाताईंनी आयत्या पिठावर रेघोट्या मारने बंद करावे – अजय मुंडे

परळी – परळी तालुक्यातील पांगरी आणि तळेगाव येथील पाणी पुरवठा योजना विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे मंजुर झाली असताना व त्याचे उद्घाटन यापूर्वी झालेले असताना पुन्हा त्याचे उद्घाटन करण्याचा पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांचा प्रयत्न म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा प्रकार असल्याचा टोला राष्ट्रवादी युवक काग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य अजय मुंडे यांनी लगावला आहे.

तालुक्यातील पांगरी आणि तळेगाव येथे ना.धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे मंजुर झालेल्या पाणी पुरवठा योजनांचे उद्घाटन दोन दिवसांपूर्वीच झालेले असताना पुन्हा त्याचे पंकजाताईंनी आज उद्घाटन केले . श्रेय घेण्याचा त्यांचा अतिशय केविलवाणा प्रयत्न असल्याचे अजय मुंडे म्हणाले. स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांचे समाधीस्थळ असलेल्या गावातील पाण्याची योजना पुर्ण करण्यासाठी साडेचार वर्ष का लागली  ?असा सवाल उपस्थित करताना पंकजाताई यांना या गावाची ग्रामपंचायत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात असल्यामुळे मंजूर  होऊ दिली नाही.

मात्र धनंजय मुंडे यांनी प्रयत्न करून योजना मंजुर केल्याने आता खोटे श्रेय घेण्याशिवाय त्यांच्या समोर पर्याय राहिलेला नाही, ज्यांना स्वतः च्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रही मंजुर करता आले नाही, धनंजय मुंडे यांनी मंजुर केलेल्या योजनांचे उद्घाटन करणे एवढेच त्यांचे कर्तृत्व असल्याचा टोलाही अजय मुंडे यांनी लगावला आहे. विकासाची इतकीच चाड असेल तर 2515 चा निधी का ग्रामपंचायतीला दिला नाही ? राजकारण का केले ? असा सवाल त्यांनी केला. 2 खात्याच्या  मंत्री आहात जरा स्वतः काही तरी करा असा सल्ला ही त्यांनी दिला आहे.

COMMENTS