…तर मंत्रालयासमोर शेतकरी मोफत दूध वाटप करतील, अजित नवलेंचा सरकारला इशारा !

…तर मंत्रालयासमोर शेतकरी मोफत दूध वाटप करतील, अजित नवलेंचा सरकारला इशारा !

पुणे – दुधामध्ये 10 रुपये प्रति लिटर तोटा शेतकरी सहन करत आहेत. तसेच 27 रुपये प्रति लिटर भाव सरकारने देऊनही तो भाव मिळत नाही. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी त्रस्त झाले असून दूध वाटपाचे कार्यक्रम 9 तारखेपर्यँत सुरू राहतील, तोपर्यंत जर सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही तर 8 दूध उपत्पादक जिल्ह्यातील शेतकरी मंत्रालयासमोर जाऊन मोफत दूध वाटप करतील असा इशारा अजित नवले यांनी दिला आहे.

तसेच सरकारने भावांतर योजना आणावी, या योजनेतील मिळणारं अनुदान थेट शेतकऱ्यांच्या अकाऊंटवर वर्ग करण्यात यावं अशी मागणीही नवले यांनी केली आहे. तसेच दूध व्यवसायात वारंवार होणारं नुकसान कायमस्वरूपी टाळण्यासाठी पर्यायी दूध धोरणाचा स्वीकार करावा असंही अजित नवले यांनी म्हटलं आहे.

COMMENTS