यापुढे घोषणा दिल्या तर तिकिटच कापतो, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना दम!

यापुढे घोषणा दिल्या तर तिकिटच कापतो, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना दम!

पिंपरी-चिंचवड – यापुढे घोषणा दिल्या तर तिकिटच कापतो असा दम राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. पिंपरी-चिंचवडमधल्या सभेत भाषण सुरू असताना माजी आमदार विलास लांडे यांनाच उमेदवारी मिळावी म्हणून जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी दिली. या प्रकारामुळे अजित पवारांचा पारा चांगलाच चढला आणि ”यापुढे घोषणा दिल्या तर तिकिटच कापतो” असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना चांगलाच दम भरला.

दरम्यान आता बेंबीच्या देठापासून घोषणा देताय मात्र 2009 मधील निवडणुकीत विलास लांडे यांनाच उमेदवारी दिली होती. परंतु त्यावेळी तुम्ही दुसय्राच बटणावर बोट दाबलं. आपल्या पक्षात अंतिम निर्णय पवार साहेब घेतात, त्यामुळे तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचवतो. त्यामुळे जरा सबुरीनं घ्या, असा सल्लाही यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

COMMENTS