मुंबई – राज्यात महाविकास आघाडीचे नेते एकमेकांसोबत तशाच पध्दतीने जिल्ह्यात तसेच स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी जमवून घ्या, असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला. राष्ट्रवादी काँग्रेसक़़डूनच ही बैठक बोलवण्यात आली होती. मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटर येथे ही बैठक होत आहे. याबैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, राजेश टोपे यांच्यासह सर्व जिल्ह्यातील नेते उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, स्थानिक पातळीवर वारंवार राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शिवसैनिकांना डावललेल जात असल्याच्या तक्रारी येत आहे. आगामी काळात आपले सरकार टिकविण्यासाठी तसेच भाजपशी लढण्यासाठी आपल्या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांना संभाळून घेतले पाहिजे. लवकरच महामंडळांचे वाटप करण्यात येणार असून नाराज नेत्यांना समावून घेतले जाणार आहे,असल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले
COMMENTS