मुंबई – काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि माझ्यात वाद झाल्याची बातमी धादांत खोटी असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. पुरातन बंगल्यावरील बैठकीत अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यात खातेवाटपाच्या बैठकीत खडाजंगी झाल्याची चर्चा होती. परंतु ही बातमी धादांत खोटी असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि माझ्यात वाद झाल्याची बातमी धादांत खोटी आहे. अशोक चव्हाण यांच्याशी माझे खूप चांगले संबंध आहेत. मी एकेकाळी ते मुख्यमंत्री असताना त्यांचा सहकारी म्हणून काम केलं आहे. त्यामुळे मी ही बातमी देणाऱ्या संबंधित वृत्तपत्राच्या प्रमुखांशी बोललो. तसेच ज्या पत्रकाराने बातमी दिली त्या पत्रकारांनी अद्याप फोन उचलला नाही. मी त्यांनाही विचारणार आहे. त्यांच्याकडे जर दुसऱ्या बातम्या देण्यासाठी नसतील तर ठिक आहे. पण इतक्या धादांत खोट्या बातम्या दिल्यास त्यांची विश्वासहार्यता कमी होईल असंही अजित पवार म्हणाले आहेत.
तसेच काँग्रेसच्या खातेवाटपाचा निर्णय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी सांगतील त्याप्रमाणे होईल आणि शिवसेनेबाबत स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असल्याने तेच यावर निर्णय घेतील, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
COMMENTS