आषाढी वारीचा पालखी सोहळा रद्द, पण माऊली आणि इतर संतांच्या पादुका पंढरपुरात पोहोचवणं ही माझी जबाबदारी – अजित पवार

आषाढी वारीचा पालखी सोहळा रद्द, पण माऊली आणि इतर संतांच्या पादुका पंढरपुरात पोहोचवणं ही माझी जबाबदारी – अजित पवार

पुणे – कोरोना व्हायरसच्या साथीमुळे यावर्षी पहिल्यांदाच आषाढी वारीचा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. आषाढीला कुठलीही दिंडी काढायची नाही, परंतु हेलिकॉप्टरमध्ये आषाढी वारीला मानाच्या प्रमुख पालख्या पंढरपुरात आणण्याबाबत निर्णय झाला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.
माऊली आणि इतर संतांच्या पादुका श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी नेण्यात येणार आहेत. त्या कशा न्यायच्या यावर अजुन निर्णय झालेला नाही. पादुका पंढरपूरात पोहोचवणं ही माझी जबाबदारी असेल अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली आहे. पुण्यात आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वारकरी संप्रदायाच्या वतीने सहभागी झालेल्या सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा सोहळा इतिसाहासात पहिल्यांदाच रद्द करावा लागतोय. सध्या ‘कोरोना’चा रोग झपाट्याने वाढत आहे. हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे गर्दी टाळणे, त्यावर एक उपाय समजला जात आहे. यामुळे आषाढी यात्रेबाबत निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी बैठक घेतली. या बैठकीसाठी सर्व प्रशासकीय अधिकारी, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहाय्यक अध्यक्ष ह.भ.प. गहणीनाथ महाराज औसेकर, प्रांत अधिकारी सचिन ढोले, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, मंदिर समितीच्या सदस्या माधवी निगडे यांच्यासह अन्य महाराज मंडळी उपस्थित होती.

COMMENTS