मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या 288 जागांसाठी आज मतमोजणी सुरु आहे. मतमोजणीची पहिली फेरी पार पडली आहे. या मतमोजणीनंतर निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे. परंतु मतमोजणीदरम्यान काही दिग्गज नेते आघाडीवर आहेत. तर काही पिछाडीवर आहेत. पिछाडीवरील नेते मागेच राहिले तर त्यांची हार होऊ शकते. महाराष्ट्रात 288 जागांपैकी काही महत्त्वाच्या ठिकाणी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. परळी, बारामती, सातारा, वरळी, शिर्डी, येवला, लातूर, भोकर, या महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे या मतदारसंघातील निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
बारामतीत राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार यांना पहिल्या फेरीत 7467 तर तर भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना आतापर्यंत अवघे 872 मतं पडली आहेत. त्यामुळे पडळकर यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
भोकरमधून काँग्रेसचे अशोक चव्हाण 2200 मतांनी आघाडीवर आहेत.
हदगाव: नागेश पाटील आष्टीकर (शिवसेना) 1500 आघाडी
नायगाव: वसंत चव्हाण ( काँग्रेस) 550 आघाडी
मुखेड : तुषार राठोड( भाजप) 800 आघाडी
देगलूर: सुभाष साबणे ( शिवसेना) 300 आघाडी
लोहा: श्यामसुंदर शिंदे( शेतकरी कामगार पक्ष ) 750 आघाडी
नांदेड दक्षिण : साबेर चाऊस (mim ) 500 आघाडी
नांदेड उत्तर फेरोज लाला ( mim ) 700 आघाडी
किनवट – भीमराव केराम ( bjp) 650 मतांनी आघाडीवर
COMMENTS