मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांनी काल आमदारकीचा राजीनामा जिला. त्यानंतर कालपासून त्यांचा फोन नॉट रिचेबल होता. परंतु आज अखेर त्यांचा फोन सुरु झाला असून त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन केला आहे. यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांना मला तुम्हाला भेटायचं आहे, असं शरद पवारांना सांगतलं असल्याची माहिती आहे. त्यावर शरद पवारांनी मुंबईत भेटू असं कळवल्याची माहिती आहे. त्यामुळे लवकरच अजित पवार आणि शरद पवार या काका-पुतण्याची बैठक होणार आहे. या भेटीनंतर अजित पवार माध्यमांसमोर बोलणार आहेत अशी माहिती आहे.
दरम्यान अजित पवार कुठे आहेत? त्यांनी राजीनामा का दिला असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. परंतु अजित पवार मुंबईतच असावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण शरद पवार पुण्याहून मुंबईला आल्याने अजित पवारही मुंबईत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची बैठक मुंबईत होणार असल्याचं बोललं जात आहे. या बैठकीनंतर अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS