उपमुख्यमंत्री अजित पवारांंनी समजूत काढल्यानंतर काँग्रेस आमदाराचं उपोषण मागे!

उपमुख्यमंत्री अजित पवारांंनी समजूत काढल्यानंतर काँग्रेस आमदाराचं उपोषण मागे!

मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवारांंनी समजूत काढल्यानंतर काँग्रेस आमदारानं उपोषण मागे घेतलं आहे. विकास निधी वाटपावरुन नाराज झालेले काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी जालन्यात उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता.परंतु आधीच महाविकास आघाडीत धुसफूस सुरु असल्यामुळे अजित पवार यांनी गोरंट्याल यांची समजूत काढली. शिवसेना नेते अर्जुन खोतकर आणि अंबेकर यांना दिलेला निधी मार्च महिन्याच्या पूर्वीचा होता. आपण उपोषण करु नये, असे अजित पवार यांनी गोरंट्याल यांना सांगितले. त्यानंतर गोरंट्याल यांनी उपोषण मागे घेतले आहे.

दरम्यान नगर विकास खात्याकडून जाणीवपूर्वक निधी दिला जात नसल्याचा आरोप काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. नगर विकास खात्याच्या निधीवाटपावरुन आपल्या एकट्याच्या नव्हे तर 11 काँग्रेस आमदारांच्या तक्रारी असल्याचा खुलासाही त्यांनी केला होता. या प्रकरणाची दखल घेतली गेली नाही तर 11 आमदार उपोषणाला बसतील असा इशारा गोरंट्याल यांनी दिला होता. ज्या नगरपालिकांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, जिथे काँग्रेसचे आमदार आहेत, तिथेच त्यांना निधी देण्यापासून डावललं जात आहे, असा थेट आरोप कैलास गोरंट्याल यांनी ठाकरे सरकारवर केला आहे. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवारांंनी समजूत काढल्यानंतर काँग्रेस आमदारानं उपोषण मागे घेतलं आहे.

COMMENTS