कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले…

कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले…

मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. अजित पवारांना कणकण आणि ताप असल्याने ते घरीच थांबून विश्रांती घेत होते. रुटीन चेकअपसाठी त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर अजित पवार यांनी ट्वीट करुन स्वत: माहिती दिली आहे. माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेससह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान कणकण आणि ताप जाणवत असल्यामुळे अजित पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय चाचणी केली होती. पहिल्यांदा त्यांची कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. परंतु पुन्हा एकदा चाचणू केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

COMMENTS