मुंबई – राज्यभरातून आलेले अनेक मराठा समाजाचे कार्यकर्त्यांचं आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी आझाद मैदानावर दोन नोव्हेंबरपासून उपोषण सुरु आहे. आझाद मैदानावर या कार्यकर्त्यांचं उपोषण सुरु असून सकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणकर्त्यांची आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आमि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भेट घेतली आहे. प्रकृती ढासळल्याने काही उपोषणकर्त्यांना रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मराठा समाजाचे गेले १२ दिवस आझाद मैदानात आरक्षणासाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे. अद्याप सरकारने त्यांची दखल घेतलेली नाही. आज राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते @AjitPawarSpeaks व विरोधी पक्षनेते @dhananjay_munde यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली व त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. pic.twitter.com/IkPVHrllhq
— NCP (@NCPspeaks) November 13, 2018
दरम्यान या उपोषणकर्त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती आहे. परंतु त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलेले नसून उपोषण सोडण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. तसेच यापुढे कोणत्याही उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळत असली, तरी रुग्णालयात दाखल होणार नाही असा इशारा आता या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. त्यामुळे हे आंदोलन जास्तच चिघळणार असल्याचं दिसत आहे.
COMMENTS