दादा आता तुमचा आदर्श घेतो आणि कठोर राहतो, अजित पवारांच्या सल्ल्यानंतर गिरीश बापटांचं वक्तव्य !

दादा आता तुमचा आदर्श घेतो आणि कठोर राहतो, अजित पवारांच्या सल्ल्यानंतर गिरीश बापटांचं वक्तव्य !

पुणे – प्रशासन चालवत असताना कठोर कसे रहावे याचा सल्ला माजी पालकमंत्री अजित पवार यांनी सध्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना दिला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे विधानभवन येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी गिरीश बापट यांना सल्ला दिला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज पालकमंत्री गिरीश बापट आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्रित आले होते. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्‍दिक टोलेबाजी झाली.

दरम्यान देवस्थानांना तिर्थक्षेत्राचा दर्जा देण्यावरुन, देवस्थान  किती मोठे आहे, तेथे वर्षाला किती भाविक येतात, अशा सर्व गोष्टींचा विचार व्हायला हवा. कोणी मागणी केली म्हणून एखाद्या देवस्थानला तिर्थक्षेत्र म्हणून घोषीत करायला नको असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं.

त्यावर उत्तर देताना बापट म्हणाले, तिर्थक्षेत्र घोषीत करण्यासाठी नियमावली ठरविली आहे. या नियमावलीच्या आधारेच एखाद्या देवस्थानला तिर्थक्षेत्राचा दर्जा द्यायचा की नाही, हे ठरविले जाते. मात्र, अनेकदा देवस्थानला तिर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा, यासाठी राजकीय दबाव टाकला जातो. त्यामुळे काही वेळेस नियम पाळले जात नाहीत.

त्यावर अजित पवार यांनी पालकमंत्र्यांनी कसे कठोर रहायला हवे अस सल्ला दिला, तर त्यांना उत्तर देताना बापट म्हणाले, दादा आता तुमचा आदर्श घेतो आणि कठोर राहतो. दोन आजी माजी पालकमंत्र्यांच्या टोलेबाजीमुळे उपस्थितांमध्ये चागंलाच हशा पिकला होता.

COMMENTS