आमच्या वाटेला जाऊ नका, आम्ही काय मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाहीत – अजित पवार

आमच्या वाटेला जाऊ नका, आम्ही काय मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाहीत – अजित पवार

सांगली – ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाभळी असतात. जर आमची खोड काढण्याचा कोणी प्रयत्न केला तर, जशास तसे उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत. आम्ही काय मेलेल्या आईच दूध प्यायलो नाहीत, आमच्या वाट्याला जावू नका, आम्ही शांत आहोत तोपर्यंत शांत आहोत असा इशारा माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिला आहे. सांगलीतील हल्लाबोल यात्रेदरम्यान ते बोलत होते.

दरम्यान जिल्ह्यातील पालकमंत्र्यांना आपल्या जिल्ह्याबाबत आपुलकी असते. ही परंपरा भाजपने मोडून काढली. सांगलीला एकही मंत्रीपद देण्यात आले नाही. हा सांगली जिल्ह्यावर अन्याय आहे. लोकशाहीची थट्टा सुरू असून सत्तेचं विकेंद्रीकरण होणं गरजेचे आहे, तरच ही सत्ता टिकून राहिल असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

राज्यात कायद्याचे राज्य आहे की नाही, आज तुम्ही सत्तेत आहात म्हणून सत्तेची ही मस्ती राष्ट्रवादी समोर दाखवू नका. आम्ही सुसंस्कृत कार्यकर्ते आहोत याचा अर्थ, आम्हाला काय करता येत नाही असे समजू नका असा इसारा यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

COMMENTS