…त्यामुळेच शिवसेनेची मळमळ बाहेर पडली –अजित पवार

…त्यामुळेच शिवसेनेची मळमळ बाहेर पडली –अजित पवार

सांगली – अजित पवार यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेला सामनाच्या आग्रलेखातून उत्तर दिलं आहे. शिवसेनेला गांडुळाची उपमा देणारे अजित पवार हे छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमची अवलाद आहे. त्यांचे तोंड व जीभ म्हणजे भ्रष्ट गटार आहे व येणाऱ्या जाणाऱ्यांवर त्याच तोंडाने थुंकून ते घाण करत असतात. शरद पवारांनी कमावलेलं अजित पवारांनी अल्पावधीतच गमावलं. अजित पवार दुतोंड्या विषारी सापाची अवलाद आहेत काय, असे शिवसेनेने म्हटले होते. त्यानंतर शिवसेनेच्या या विखारी टीकेला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं असून मी गांडूळ म्हटल्याने शिवसेनेची मळमळ बाहेर पडली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आता गांडूळ कोण हे जनताच ठरवेल असंही अजितदादांनी म्हटलं आहे.

दरम्यान शिवसेना गेल्या १५ वर्षांपासून सत्तेपासून दूर होती. त्यामुळे आता त्यांना सत्ता हवी आहे. शिवसेनेचे १२ मंत्री आहेत. हे नेतेमंडळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारले की गप्प बसतात आणि तिथून बाहेर पडल्यावर सरकारवर टीका केली जाते. ही दुटप्पी भूमिका असल्यानेच मी शिवसेनेचा उल्लेख गांडूळ असा केला होता, असं अजितदादांनी म्हटलं आहे. तसेच शिवसेना म्हणजे ढेपेला लागलेला मुंगळा असल्याची टीकाही यावेळी त्यांनी केली आहे. हल्लाबोल यात्रेदरम्यान ते सांगलीत बोलत होते.

 

COMMENTS