पुणे – मला भावी मुख्यमंत्री व शरद पवारांना भावी पंतप्रधान म्हणु नका काहींच्या ते डोळ्यात खुपत असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलं आहे. ते बारामती तालुक्यातील माळेगाव येथील एका खासगी उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलत होते. काही नेते व कार्यकर्ते अजित पवार यांना राज्याचे भावीमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भावी पंतप्रधान असा उल्लेख करतात यावर अजित पवार यांनी भाष्य करत असे कुणीही म्हणू नका काहींच्या ते डोळ्यात खुपत असून मग पाडापाडीचे राजकारण सुरू होते त्यामुळेच आपली माती झाली असे म्हणत बघा कसे कॅमेरे अटेंशनमध्ये लागले आहेत. असा टोलाही त्यांनी माध्यमांना लगावला.
पुतळे उभारणे भावनिक बनविण्यासाठी मंदिर गावांचे नामंतर आणि आता कर्जमाफीतुन जनाधार मिळवण्यासाठीचा प्रयत्न ह्यात हे सरकार गुंतले आहे. सध्या काय परिस्थितीचे गांभीर्य विचारात न घेता हे सरकार पुतळे उभारणे लोकांना भावनिक बनविण्यासाठी मंदिर आणि गावांचे नामांतर यात गुंतले असून पाच राज्यात पराभव झाल्यानंतर कर्जमाफी देण्याच्या विचाराधीन असून जनाधार मिळवण्याचा प्रयत्न ते करत असल्याची टीकाही पवारांनी केली आहे.
तसेच माझ्या इतका अनुभव साखर कारखानदारीचा कुणालाच नाही असे म्हणत त्यांनी मी जेवढे साखर कारखाने उभे केले आणि मदत करतो त्यामुळे माझ्याकडे पुसदचे काहिजण वसंतदादा सहकारी साखर कारखाना चालवायला घ्या म्हणून एवढी बिकट परिस्थिती महाराष्ट्रात साखर धंद्याची सुरू असल्याचेही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.
COMMENTS