बारामती – बारामती लोकसभा मतदारसंघातील सभेत अजित पवार यांचं भाषण सुरु होतं. यावेळी भाजपच्या प्रचाराची गाडी बाजूच्या रस्त्यावरुन जात होती. त्यावेळी या गाडीमधील स्पीकरचा आवाज ऐकून अजित पवारांनी आपलं भाषण थांबवलं आणि म्हणाले माझं भाषण ऐकूण बावचळून जाशील. हे ऐकताच या सभेत एकच हशा पिकला होता.
दरम्यान आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आज बारामती तालुक्यातील माळेगावात दुपारी अजित पवारांची सभा सुरू होती. सभा ऐन रंगात असताना अचानक रस्त्यावरुन भाजपाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचाराच्या दोन गाड्या एकामागून एक आल्या. या गाड्यातील स्पीकरमधून भाजपाचा जोरदार प्रचार सुरु होता. त्यामुळं रस्त्यालगतच सुरू असलेल्या सभेतील अजित पवारांच्या भाषणाला अडथळा आला. त्यावेळी अजित पवारांना काही वेळ आपले भाषण थांबवावे लागले. त्यानंतर लगेच अजित पवार म्हणाले ” अजित पवार काय म्हणतायेत हे ऐकायला ते आलेत.. आरं.. अजित पवार बोलतो ते ऐकल्यावर तू सुद्धा घड्याळाचं बटण दाबशील. माईकवर पण तू सांगशील आता ‘ती’ नको घड्याळ घड्याळ घड्याळ…. एवढा बावचाळून जाशील.हे ऐकताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला होता.
COMMENTS