महाराष्ट्र कधीही चुकीच्या रस्त्याने गेलेला नाही – अजित पवार

महाराष्ट्र कधीही चुकीच्या रस्त्याने गेलेला नाही – अजित पवार

पुणे- “मधल्या काळात या शौर्यदिनाला गालबोट लागले होते. मात्र, महाराष्ट्राच्या जनतेने त्या अफवांवर विश्वास ठेवू नये. जनतेने नेहमी शांततेने याठिकाणी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र कधीही चुकीच्या रस्त्याने गेलेला नाही, ही आपली परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी, शाहू महाराज, महात्मा फुले या सर्वांनी जो आदर्श आपल्यापुढे ठेवला. त्याचाच आदर करत आपण पुढे वाटचाल करत असतो.” भिमा-कोरेगाव येथील जयस्तंभ विकास आराखड्यासाठी मागील सरकारने जो निधी मजूर केला होता तो अजून आला नाही, मात्र एकमेकांना ढकलून चालणार नाही”, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

अजित पवार हे आज शौर्यदिनानिमित्त जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी कोरेगाव-भीमा येथे पोहोचले. येथे त्यांनी कोरेगाव-भीमा युद्धाच्या 202 व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी अभिवादन केले. पवार म्हणाले आज 2021 सुरु झालं दरवर्षीप्रमाणे कोरेगाव-भीमाच्या लढाईत जे शूरवीर शहीद झाले, त्या सर्वांना अभिवादन करण्यासाठी मी स्वत:, माझ्यासोबत गृहमंत्री अनिल देशमुख ऊर्जामंत्री नितीत राऊत यांच्यासह अनेक कार्यकर्ते इथे अभिवादन करण्यासाठी आलो”, अशी माहिती अजित पवारांनी यावेळी दिली.कोरोनाचं संकट असल्यामुळे घरातून जयस्तंभाला अभिवादन करण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे घरातूनच जयस्तंभाला अभिवादन करावे, असे आवाहन करतो. कोरोना काळात सुरक्षितता बाळगणं महत्वाचं आहे”, असे आवाहन पवारांनी केले.

COMMENTS