पुणे, इंदापूर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुधात भेसळ करू नका अशी तंबी शेतक-यांना दिली आहे. इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील सभेत बोलत असताना अजित पवार यांनी शोले चित्रपटातील डायलॉग म्हणत शेतक-यांना तंबी दिली आहे. शोलेमधील चक्की पिसिंग & पिसिंग हा विरुचा डायलॉग अजित पवार यांनी मारला आहे.
दरम्यान दुध व्यवसाय हा ग्रामीण भागातील शेतीला जोड व्यवसाय असल्याने ग्रामीण भागात दुध भेसळीचे प्रकार मोठ्याप्रमाणावर घडत असतात. दुध भेसळ करणारांना जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद शासनाने केली आहे. त्यामुळे आता दुध भेसळीवर नियंत्रण येणार आहे. मात्र तत्पूर्वी अजित पवार यांनी आपल्या दुध व्यावसायातील कार्यकर्त्यांना दुध भेसळ करु नका अशी तंबी दिली आणि मला माहितच नव्हतं जन्मठेपेची शिक्षा आहे.
मी तुमच्याजवळचा आहे या सबबी चालणार नाहीत असे भर सभेत सांगत दुध भेसळ होणार नाही याची खबरदारी घ्या असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच आपल्या कार्यकर्त्यांकडुन दुधात भेसळ केली जाऊ नये यासाठी खबरदारी आमचे कार्यकर्ते घेत असल्याचे दिसले असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी मारलेल्या या डायलॉगमुळे कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच हशा पिकला असल्याचं पहावया मिळाले.
COMMENTS