पुणे -भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गेल्या रविवारी बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. यावर यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया देताना केवळ शिवेंद्रसिंहराजेच नाही, तर राष्ट्रवादी सोडून गेलेले अनेक नेते राष्ट्रवादीत परतणार असल्याचा दावा केला होता.
पुण्यात याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत विचारले असता अजितदादांनी पत्रकारांना हा प्रकार म्हणजे शिळ्या कडीला उतू आणण होय. असे म्हणत वारंवार तेच तेच प्रश्न विचारु नका. जेव्हा कोणी पक्षात येईल तेव्हा मीच जाहीर करीन, असे सांगितले.
शिवेंद्रसिंहराजे यांनी गेल्या महिनाभरात अजित पवार यांची तिसऱ्यांदा भेट घेतली. तसेच भाजपचे इतर आमदारही वारंवार अजित पवार यांना भेटत आहेत. त्यामुळे ते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार असल्याची चर्चाही आहे. यावर अजित पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून हा विषय़ थांबवला.
तसेच शेतकऱ्यांना भेटण्यासाठी राज्यपालांना भेटण्यासाठी वेळ दिला नसल्याबद्दल विचारले असता “पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे राज्यपाल भेटू शकणार नाही अशी माहिती मला मिळाली. मात्र अशावेळी इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी कार्यक्रम थोडा बदलायचा होता. कोणाला प्राधान्य द्यायचे हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे”.असेही पवार यांनी म्हटले
COMMENTS