मुंबई – मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आणि टीसचा अहवाल सादर होत नाही तोपर्यंत सभागृह चालू देणार नसल्याची भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे. तसेच सभागृहात बोलत असताना सरकार वेळकाढूपणा करत संभ्रम करत असून पळपुटेपणा करत आहे, अधिवेशनात कमी दिवस काम कसे करता येईल, याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोपही यावेळी अजित पवार यांनी केला आहे.
सरकार कामकाज रेटून नेत आहे. सभागृहात गोंधळ सुरू असताना सरकार विधेयके काढत आहे, असा कारभार कधी पाहिला नाही, हे दुर्दैवी आहे. लोकांना आपण काय उत्तर द्यायचं याचा विचार सरकार करत नाही. सरकारने सोमवारी कामकाज सुरू होताच अहवाल सादर करावा, हे आमचे निक्षून सांगणे आहे. – @AjitPawarSpeaks
— NCP (@NCPspeaks) November 22, 2018
दरम्यान सरकार कामकाज रेटून नेत आहे. सभागृहात गोंधळ सुरू असताना सरकार विधेयके काढत आहे, असा कारभार कधी पाहिला नाही, हे दुर्दैवी आहे. लोकांना आपण काय उत्तर द्यायचं याचा विचार सरकार करत नाही. सरकारने सोमवारी कामकाज सुरू होताच अहवाल सादर करावा, हे आमचे निक्षून सांगणे होते. परंतु सरकारनं तसं केलं नसल्याचंही यावेळी सभागृहात अजित पवार यांनी म्हटलं आहे.
COMMENTS