तुमची साथ असेल तर मी कोणाच्या बापाला घाबरत नाही – अजित पवार

तुमची साथ असेल तर मी कोणाच्या बापाला घाबरत नाही – अजित पवार

सोलापूर – आगामी विधानसभा निवडणुकीत सगळ्या भागातून आघाडीचे उमेदवार निवडून आले पाहिजे. आपला आकडा राज्यात 175 जागांचा आहे. आपल्याला राज्यात आघाडी सरकार आणायचे आहे. अजून काही गोष्टी घडतील. काही लोक थांबतील तर कोणी आणखी निघून जाईल. तुमची साथ असेल तर मी कोणाच्या बापाला घाबरत नाही असं आवाहम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोन नेत्यांचा शेतीशी कधी संबंध आला का? पीकविमा म्हणजे फसवाफसवी आहे. टीकोजीराव तीन वर्षांनतर कर्जमाफी देतात, आम्ही एका झटक्यात कर्जमाफी दिली. मते घ्यायची आहे. म्हणून कर्जमाफी मुदतवाढ दिली जात आहे. आता सरकार नोकरभरती करत आहे. पाच वर्षांत नोकऱ्या का दिल्या नाहीत असा सवालही अजित पवार यांनी केला आहे.

दरम्यान यावेळी बोलत असताना अजित पवार यांची सोलापुरात जीभ घसरली असल्याचे पहावयास मिळाले. नाशिकमध्ये पूर आला तरी मंत्री नाचतात, नाच्याचे काम तुमचे नाही मंत्री, अशा शब्दात अजित पवार यांनी गिरीश महाजन यांना टोला लगावला आहे. तसेच 15 ऑगस्टला ग्रामपंचायतीत बॅलेटवर निवडणूक घेण्याची मागणी करा, ईव्हीएमवर निवडणूक नको, अशी भूमिका घ्या. ईव्हीएम विरोधात मोर्चा काढू, असही अजित पवार यांनी या वेळी जनतेला म्हटलं आहे. ते सोलापुरात बोलत होते.

COMMENTS