विधानसभेत अजित पवारांची फटकेबाजी, मंत्रिपद मिळवण्यासाठी शिवसेना-भाजप आमदारांना सांगितली भन्नाट ‘आयडिया’!

विधानसभेत अजित पवारांची फटकेबाजी, मंत्रिपद मिळवण्यासाठी शिवसेना-भाजप आमदारांना सांगितली भन्नाट ‘आयडिया’!

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत जोरदार फटकेबाजी केली. यावेळी अजित पवार यांनी शिवसेना – भाजपा आमदारांना टोला लगावला आहे. शिवसेना आणि भाजपा आमदार निवडून येऊन काय फायदा. तुम्हाला मंत्रीपद तर मिळत नाही, बाहेरून आलेल्यांना लगेच मंत्रीपद मिळते.
त्यामुळे शिवसेना आमदारांनी राष्ट्रवादीत यावं आणि भाजपा आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा. मंत्रीमंडळ विस्तार आला की पुन्हा आपल्या पक्षात प्रवेश करावा म्हणजे तुम्हाला मंत्रीपद मिळेल असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.

तसेच राधाकृष्ण विखे आमच्या बाजूला होते तेव्हा मुंबईच्या डीपी घोटाळ्याबाबत आरोप केला होता. 1 लाख कोटीचा घोटाळा डीपीमध्ये झाला असून त्यातून 10 हजार कोटी रुपये मुख्यमंत्री कार्यालयाला मिळाल्याचा आरोप विखेंनी केला होता. आता विखे गृहनिर्माण खात्याचे मंत्री झाले आहेत त्यांनी आता त्यांच्या आरोपांवर खुलासा करावा आणि मुख्यमंत्र्यानीही याबाबत स्पष्टीकरण द्यावे अशी मागणीही यावेळी अजित पवार यांनी केली आहे.

दरम्यान समस्यांचा डोंगर फोडण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्ष नेत्यालाच फोडले. विखे यांनी त्यांच्या बंगल्यावर Thugs of Maharashtra असं म्हणत देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो लावले होते. मग ते लगेच ठगांच्या टोळीत कसे सामील झाले. असा सवालही अजित पवार यांनी केला आहे.

यावेळी अजित पवार यांनी संख्यावाचनावर सरकारची खिल्ली उडवली.

आता मोबाईल नंबर कसा बोलायचा
– 9892 कसं म्हणायचं.. 90 वर 8, 90 वर 2
– अहो हे काय चाललंय..? भावी पिढीचं नुकसान, वाटोळं करतोय. आता मंत्री बावनकुळे कसं म्हणायचं?
50 वर 2 कुळे असं म्हणायचं ???
– विसपुते… यांना 20 वर शून्य पुते???
– फडणवीस यांना फडण 20 वर शून्य…या अशी हाक मारायची का आम्ही? असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.

COMMENTS