ही काय पद्धत झाली का?,  सभागृहात अजित पवार भडकले!

ही काय पद्धत झाली का?, सभागृहात अजित पवार भडकले!

मुंबई – आजचा पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आजच्या दिवशीही दोन्ही सभागृहात विरोधी पक्षातील आमदारांनी जोरदार गोंधळ घातला. विधानसभेत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले असल्ृाचं पहावयास मिळाले. सुनिल प्रभू यांनी मंत्री अशोक उईके यांच्या जागेवरून प्रश्न विचारला. यावरुन अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

‘मंत्र्यांना मागे बसवलंय…प्रश्न विचारताना स्वत: च्या जागेवरून प्रश्न विचारा,’ असं म्हणत अजित पवार यांनी विधानसभेत संताप व्यक्त केला. सुनिल प्रभू यांनी मंत्री अशोक उईके यांच्या जागेवरून प्रश्न विचारला. त्यावर अजित पवारांनी टीका केली. तर दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अजित पवार यांना उत्तर दिलं आहे.’अजितदादांना सुनिल प्रभू आणि आशिष शेलार यांना एकमेकांशेजारी बसल्याचं बघायचं नाही,’ असा टोला मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला.

COMMENTS