अमरावती – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलासा देणारी आणखी एक बातमी समोर येत आहे. नागपूरनंतर अमरावती विभागातील सिंचन घोटाळ्यातही अजित पवारांना क्लीनचिट देण्यात आली आहे. अनियमिततेची सर्व जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्यात आली आहे. नियमानुसार, कायदेशीर बाबी तपासण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची होती. त्यांनी तसं केलं नाही. त्यामुळं अजित पवार यांना कोणत्याही गैरव्यवहारासाठी जबाबदार धरता येणार नसल्याचं
लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं म्हटलं आहे. याबाबतचं प्रतिज्ञापत्र अमरावतीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलं आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना विदर्भातील सिंचन घोटाळा प्रकरणात क्लीनचिट देण्यात आली आहे. एसीबी अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात शपथपत्र दाखल केलं होतं. अजित पवार यांच्याविरुद्ध कोणतीही फौजदारी कारवाई करता येणार नसल्याचं शपथपत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्यानंतर आता
अमरावती विभागातील सिंचन घोटाळ्यातही अजित पवारांना क्लीनचिट देण्यात आली आहे. त्यामुळे अजित पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
COMMENTS