राष्ट्रवादीत उभी फूट एवढे आमदार अजित पवारांच्या पाठिशी ?

राष्ट्रवादीत उभी फूट एवढे आमदार अजित पवारांच्या पाठिशी ?

मुंबई – राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असल्याची चर्चा होती. परंतु असं असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवनात हा शपथविधी पार पडला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं अभिनंदन केलं आहे.

दरम्यान बहुमत सिद्ध करण्यासाठी फडणवीस सरकारला ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली असून राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली असल्याची माहिती आहे. यावेळी 22 आमदार अजित पवारांसोबत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अजित पवारांनी शरद पवारांच्या पाठित खंजीर खुपसला असल्याची चर्चा राज्यात सुरु आहे.

COMMENTS