मुंबई – हल्लबोल यात्रेदरमन्यान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. नारायण राणे यांची अवस्था आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखी झाली आहे. त्यांना फडणवीस सरकारने मंत्रीपदाचे गाजर दाखवले आणि मंत्रीपद मिळेना म्हणून राणे हताश झाल्याची टीका अजित पवार यांनी केली होती.
राणे साहेबनी स्वतःच्या कर्तृत्वावर सगळी पदं मिळवली तुमच्या सारखी फुकट नाही मिळाली. पवार आडनाव काडा तुम्हाला बारामतीत कुत्रा सुद्धा नाही विचारणार https://t.co/NoEK8DpP2f
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 21, 2018
या टिकेला राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवरुन प्रत्युत्तर दिले आहे. राणेसाहेबांनी जे काही मिळवले आहे. ते आपल्या कर्तुत्वावर मिळवले आहे. तुम्ही पवार आडनाव काढा तुम्हाला बारामतीमध्ये कुत्रंसुद्धा विचारणार नाही या शब्दात राणे यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल चढवला. अजित पवारांनी कधीच मराठा समाजाची बाजू घेतली नाही. आरक्षण मराठा समाजाला मिळायला हवं असं कधी बोलले नाही. महाराष्ट्राच्या मोठ्या आणि महत्वाच्या विषयांवर ठाम भूमिका अजित पवारांनी कधी घेतली नाही. 15 वर्षात सिंचन महाराष्ट्रात फक्त 2 टक्क्यावर ठेवलं… धरण भरणारे दादा असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.
https://twitter.com/meNeeleshNRane/status/955082286889930752
COMMENTS