…अन् आदित्य ठाकरेंच्या मदतीला अजित पवार धावले !

…अन् आदित्य ठाकरेंच्या मदतीला अजित पवार धावले !

मुंबई – राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. विधानसभेत कामकाजादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार हे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मदतीला धावले असल्याचं पहावयास मिळाले. मंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच विधानसभेत प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी आदित्य ठाकरे यांना अडचणीत आणण्याच्या दृष्टीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रश्न उपस्थित केला. एशियन डेव्हलपमेंट बँक ही पायाभूत प्रकल्पांच्या विकासासाठी निधी देते, मात्र पर्यटन विकासासाठी निधी दिला जात नाही, यासाठी सरकार काय करणार असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला.

यावर उत्तर देताना आदित्य ठाकरे हे अडचणीत येतील हे लक्षात येताच अजित पवारांनी हस्तक्षेप करत स्वत: उत्तर दिलं. गेल्या महिन्यात या संदर्भात बैठक घेण्यात आली. विरोधकांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे. पायाभूत सुविधांसाठी अशाप्रकारच्या संस्था निधी देण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून विरोधी पक्षांकडून जे काही सुचवण्यात येत आहे, तेच आम्ही अंमलात आणत असल्याचं अजित पवार म्हणाले.

COMMENTS