त्यामुळे अजित पवारांनी मागितली अण्णा हजारेंची  माफी !

त्यामुळे अजित पवारांनी मागितली अण्णा हजारेंची माफी !

अहमदनगर – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची माजी उपमुख्यमंत्री अजिच पवार यांनी माफी मागितली आहे. ‘मलिक यांच्या त्या वक्तव्याशी पक्षाचा काही संबंध नाही. यामुळे हजारे दुखावले गेल्याने आपण दिलगिरी व्यक्त करतो असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अण्णा संतप्त झाले होते.
मलिक यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना हजारे संघाचे एजंट असल्याचा आरोप केला होता. त्यावर हजारे यांच्या समर्थकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. हजारे यांनीही याची दखल घेत कायदेशीर सल्ला घेऊन मलिक यांच्याविरूद्ध दावा दाखल करणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर अजित पवार यांनी अकेर अणांची माफी मागितली आहे.

COMMENTS