काट्यानेच काटा काढावा लागतो, तरच 145 ची मॅजिक फीगर गाठणे शक्य होणार – अजित पवार

काट्यानेच काटा काढावा लागतो, तरच 145 ची मॅजिक फीगर गाठणे शक्य होणार – अजित पवार

पुणे – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. गेले काही दिवस आघाडीसंदर्भातील चर्चेसाठी मुंबईत होतो, त्यात वेळ गेला. राजकारणात कधी कुणाची मक्तेदारी नसते खचून जाऊ नका, नाउमेद होऊ नका, प्रामाणिकपणे पुढे जात असताना समाज आपल्या पाठीशी उभा राहत असतो असं आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे.

यावेळी त्यांनी सरकारवरही जोरदार टीका केली आहे. लोकसभेच्या वेळी पुलवामा आणलं, वातावरण बदललं. आता ३७० आणलंय जनतेचं मूळ प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जातो. लोकसभेच्या वेळी धर्मनिरपेक्ष विचारांची मतं एकत्र आली असती तर वेगळं चित्र बघायला मिळालं असतं या सरकारनं दिलिप कांबळे, प्रकाश मेहता, बडोले यांची मंत्रिपद का काढली? पुण्यातील आधीच्या खासदारांना यावेळी उमेदवारी दिली नाही, का घरी बसवलं? याचा अर्थ हे काही काम करत नाहीत. काहीतरी गडबड असल्याशिवाय या लोकांना काढलं नसतं.
२ महिन्यात ३५० जीआर काढले, ५ वर्षे झोपा काढल्या काय? असा सवालही अजित पवार यांनी केला आहे. या सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग सुरु आहे. काहीजण गेले ते बरं झालं, ते जायलाच पाहिजे होते असंही पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान एका कार्यकर्त्यानं आपल्याच कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी अजित पवार यांच्याकडे केली. त्यावेळी त्यांनी निवडणूकीत इवलेक्टिव्ह मेरीट महत्त्वाचा असतो. त्यामुळे डिपाॅझ्ट गेले तरी चालेल पण आपल्याच कार्यतर्त्याला उमेदवारी द्या याला काही अर्थ नाही. गरज असल्यास बाहेरच्याला घेऊन उमेदवारी द्यावी लागेल. काट्यानेच काटा काढावा लागतो. तरच 145 ची मॅजिक फीगर गाठणे शक्य होणार आहे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS