पाणी प्रश्नावरुन अजित पवारांची प्रतिक्रिया !

पाणी प्रश्नावरुन अजित पवारांची प्रतिक्रिया !

बारामती – बारामतीचं पाणी दुसरीकडे वळवण्याबाबत सरकार करत असलेल्या हालाचालींवरून राज्यात आता राजकारण तापू लागलं आहे. नीरा देवघर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याचा आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. याबाबतचा अध्यादेश येत्या दोन दिवसात काढला जाईल असं महाजन म्हणाले आहेत. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इथेही लोकच राहतात आणि तिकडेही लोकच राहतात. आता ज्यांच्याकडे अधिकार आहेत त्यांनी ठरवावं कुणाला आणि कसं पाणी द्यायचं, असं अजित पवार म्हटलं आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांच्याकडून चारा छावण्यांना भेट देण्यात आली. त्यावेळी अजित पवार बोलत होते. आम्हाला आता दुष्काळात राजकारण करायचं नाही. दुष्काळात प्राथमिकता लोकांना पाणी देण्याची आणि जनावर जगवण्याची आहे. आता बाकीचे प्रश्न आणि नंतर राजकारण असंही अजित पवार म्हणाले आहेत.

COMMENTS