मुंबई – राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने घेतलेल्या या निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मला मनस्वी आनंद आणि समाधान असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. तसेच निकाल लागण्यापूर्वीच २६ महिने त्यांना तुरुंगवास भोगावा लागला याची खंत वाटत असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच येत्या काळात त्यांचं निर्दोषत्व न्यायालयात सिद्ध होईल,असा विश्वासही यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
भुजबळ साहेबांच्या बाबतीत न्यायालयाने घेतलेल्या जामीन मंजूर निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मला मनस्वी आनंद, समाधान आहे. याची खंत वाटते की, निकाल लागण्यापूर्वीच २६ महिने त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. येत्या काळात त्यांचं निर्दोषत्व न्यायालयात सिद्ध होईल,असा विश्वास आहे. pic.twitter.com/I8HuoN6nFS
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 4, 2018
दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाकडून भुजबळांचं वय लक्षात घेत जामीन मंजूर केला आहे. भुजबळांना 5 लाखांचा जामीन मंजूर झाला आहे. तसेच बोलावतील तेव्हा चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहणं, साक्षीदारांना प्रभावित न करणं, या अटींवर छगन भुजबळांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
COMMENTS