मुंबई – अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सरकारचा शेवटच अर्थसंक्लप सादर केला. शेतकरी आणि ग्रामीण भागाला झुकतं माप देणारा हा तुटीचा अर्थसंकल्प आहे. चार महिन्यात निवडणुका असल्याने सरकारचा हा अतिरिक्त अर्थसंकल्प होता. ग्रामीण भागासोबतच उद्योगाला उभारणी देण्याचा प्रयत्नही सरकारने केलाय. पण ठोस अशा उपायोजना यात नाहीत अशी टीका विरोधीपक्षांनी केली आहे. त्याचबरोबर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प सादर करण्याआधीच टि्वटरवर प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात माफी मागितली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे.
दरम्यान अर्थसंकल्प फुटलेला नाही. विरोधकांचा गैरसमज झालाय. सध्या डिजिटलमाध्यमं अतिशय प्रगत झाली आहेत. ट्विटरवर अर्थमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर काही क्षणात गोष्टी येताहेत. हे बदललेल्या तंत्रज्ञानाचा परिणाम आहे. विरोधीपक्षांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. असं मुख्मंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच ते सरकारवर टीका करण्यासाठी ट्विटरचा योग्य वापर करतात मात्र सरकारची बाजू लक्षात घेत नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
COMMENTS