पिंपरी चिंचवड – हल्लाबोल समारोपाच्या पुण्यातल्या सभेला छगन भुजबळ हजर राहणार आणि विचार ही मांडणार असल्याचा पुनरोच्चार राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. तसेच यावेळी त्यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. गप्पा मारण्यापेक्षा उपाययोजना करा असं अजित पवार यांनी यावेळी भाजप सरकारला म्हटलं आहे.
दरम्यान 2022 पर्यंत भिक-यांनाही घरे देणार असल्याचं वक्तव्य भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्याची खिल्लीही अजिति पवार यांनी उडवली असून राज्य सरकारने शास्तीकर रद्द करून अनधिकृत बांधकाम धारकांना दिलासा मिळालाय खरा, पण पूर्व अनुभव पाहता जोपर्यंत जीआर येत नाही तोपर्यंत लबाडा घरचे आवताण असल्याची टीकाही अजित पवार यांनी केली आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी पालघर निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ क्लिपवरून मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.
COMMENTS