अजित पवार म्हणाले, चंद्रकांतदादांना माझ्या बाजूला बसू द्या, त्यांचं आमच्यावर प्रेम आहे!

अजित पवार म्हणाले, चंद्रकांतदादांना माझ्या बाजूला बसू द्या, त्यांचं आमच्यावर प्रेम आहे!

पुणे – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील एकमेकांच्या शेजारी बसल्याचे पाहायला मिळालं. पुण्यात कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी हजेरी लावली. या बैठकीमध्ये अजित पवार आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील एकमेकांच्या शेजारी बसले होते. त्यावेळी अजित पवारांनी “बसू द्या, आमच्या शेजारी, त्यांचं आमच्यावर प्रेम आहे.” असं गिरीश बापट यांच्याशी हातवारे करत म्हणाले.

दरम्यान पुणे जिल्ह्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि जिल्हाधिकारीही उपस्थिती होते. यावेळी जिल्ह्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा नियोजन करण्यात आले.या बैठकीला सुरुवात होण्यापूर्वी अजित पवार अध्यक्षस्थानी येऊन बसले. यानंतर काही वेळाने चंद्रकांत पाटील या ठिकाणी आले आणि ते अजित पवारांच्या बाजूला जाऊन बसले. त्यावेळी अजित पवारांनीही “बसू द्या, आमच्या शेजारी, त्यांचं आमच्यावर प्रेम आहे.” असं गिरीश बापट यांच्याशी हातवारे करत म्हणाले.

COMMENTS