मुंबई – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला. मराठा समाजाच्या तरुणांचं आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. हा मुद्दा चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत मांडला. मराठा समाजाचे लोक आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या प्रश्नातून काही मार्ग निघत नाही. काही मुलांची सेवा सामावून घ्यावी अशी मागणी आहे. अजित पवार ऑन द स्पॉट निर्णय घेतात. जसा त्यांनी रात्री निर्णय घेतला आणि सकाळी शपथविधी झाला असं म्हणत पाटील यांनी अजित पवारांना टोला लगावला.
दरम्यान चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अजित पवार लगेच उठले. दोन-तीन दिवसात मराठा आंदोलकांबाबत बैठक घेऊन निर्णय घेऊ. त्यात काही वेगळे मुद्दे आहेत असं ते म्हणाले. त्यानंतर चंद्रकांतदादांच्या शपथेवरील टोल्याला प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले चंद्रकांतदादा तुम्ही म्हणाला रात्री निर्णय घेतला आणि सकाळी शपथ घेतली…. असं म्हणत असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मध्येच हस्तक्षेप केला. फडणवीस लगेच अजितदादांकडे पाहून म्हणाले तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही बोलू नका, मीही बोलत नाही. हे ऐकूण अजित पवार शांत झाले आणि म्हणाले फडणवीस बोलले म्हणून मी पुढे बोलत नाही.
COMMENTS