…त्यामुळे सरकार स्थापन करण अशक्य – अजित पवार

…त्यामुळे सरकार स्थापन करण अशक्य – अजित पवार

मुंबई – राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी निमंत्रण दिलं असलं तरी एकट्या राष्ट्रवादीने निर्णय घेऊन काही करणं शक्य नसल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.भाजप-शिवसेनेचं बिनसलं आणि त्यांच्यात मार्ग निघाला नाही. शेवटी शिवसेनेने वेगळी भूमिका घेतली. आता फक्त आम्ही कोणताही निर्णय घेतला तरी सरकार स्थापन होऊ शकत नाही. आमच्यासोबत काँग्रेस आली तरच मार्ग निघू शकतो.काँग्रेसनं इथं येणं गरजेचं आणि आमच्याशी चर्चा करायला हवी. आमदार जयपूरमध्ये आणि नेते दिल्लीत ते इथं पोहचल्यावर चर्चा शक्य आहे असंही अजित पवार म्हणाले आहे.

दरम्यान राज्यपालांनी सर्व आमदारांच्या सह्या असलेलं पत्र मागितलं आहे. ही विचित्र अट पूर्ण करणं अवघड आहे. स्थिर सरकार हवं असेल तर तिघांनी एकत्र होऊन आणि त्यात एकवाक्यता असेल तरच शक्य आहे. आघाडीमध्ये समजुतदारपणा होता.

मात्र आम्ही शिवसेनेसोबत कधीच सरकार चालवलेलं नाही त्यामुळे अनेक प्रश्न आहेत.आम्ही याबाबत विचार केला आहे पण काँग्रेसनेही विचार केला पाहिजे. आज आम्ही चर्चा करू आणि आमच्यात काही ठरलं तर पुढचा निर्णय घेऊ असंही अजित पवार म्हणाले आहेत.

COMMENTS