इंदापूर – काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी विधानसभेच्या उमेदवारीचा निर्णय झाला, तरच आघाडीच्या उमेदवारांचं काम करु अशी भूमिका इंदापूरमधील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली होती. त्यावर अजित पवार यांनी आधी लोकसभा जिंकायची आहे, मग विधानसभेबाबत चर्चा करु असं म्हटलं आहे.
दरम्यान लोकसभेला आम्ही आघाडीचं काम करतो, मात्र त्यानंतर येणाऱ्या विधानसभेला नेहमी आमचा घात केला जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीवर केला आहे. त्यामुळे लोकसभेची आघाडी होण्याअगोदर इंदापूर विधानसभेच्या जागेचा निर्णय करा, मगच आम्ही आघाडीच्या उमेदवाराचे काम करु असं मत त्यांनी मांडलं होतं. परंत इंदापूर विधानसभेचा प्रश्न आला कुठे? असा प्रश्न उपस्थित करत आम्ही लोकसभेच्या 48 जागांबाबत चर्चा करतोय. आधी लोकसभा जिंकायचीय आणि नंतर विधानसभेबाबत चर्चा करु असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
COMMENTS