मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार याच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. २५ हजार कोटींचा हा घोटाळा असून २००१ मध्ये रिझर्व्ह बँकेने राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. त्यानंतर चौकशीचेही आदेश दिले होते. हे सगळे प्रकरण कोर्टात आहे, आता या प्रकरणी कोर्टाने अजित पवारांसह एकूण पन्नास जणांविरोधात येत्या पाच दिवसात गुन्हा दाखल करा असे म्हटले आहे.
दरम्यान या प्रकरणाचा अजित पवारांनी स्वतःहून केला खुलासा केला आहे. मी संचालक बोर्डाच्या एका ही बैठकीला हजर नव्हतो, त्यात काही अनियमितता झाली असेल तर त्यात दोषी वर कारवाई होईल,
कोर्टाने नेमका काय निर्णय दिलाय हे मला अजून कळाल नाहीये, या बँकेच्या बोर्डावर 55 जण होते,अनेक मान्यवरांनी या बँकेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे,या प्रकरणात एफआयआर दाखल करण्याचं सांगितल्याची ऐकीव बातमी मला कळाली आहे,माझ्या वकिलाच्या हातात अजून ऑर्डर ची कॉपी मिळालेली नाहीये,त्यामुळे यावर मी अधिक भाष्य करण योग्य नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
COMMENTS