एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आले तर, अजित पवार म्हणतात…

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आले तर, अजित पवार म्हणतात…

मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. याबाबत त्यांनी परळी येथील मेळाव्यात संकेतही दिले आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी खडसे यांनी दिल्लीत जाऊन शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर ते राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा रंगली याबाबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना विचारले असता त्यांनी एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आले तर त्यांचं स्वागतच करु.य, एकनाथ खडसे हे मोठे नेते आहेत. त्यांनी इच्छा व्यक्त केली तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचं स्वागत आहे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान भाजपाने शिवसेनेला दिलेल्या ऑफरबाबत विचारले असता भाजपाने शिवसेनेला ऑफर देऊ दे की काहीही हरकत नाही. तो त्यांचा प्रश्न आहे. सध्या शिवसेना आमच्यासोबत आहे एवढंच मी सांगतो असंही अजित पवार म्हणाले आहेत.

राष्ट्रवादीला आणखी एक मंत्रिपद मिळणार

राष्ट्रवादीला अजून एखादं खातं मिळू शकते, थोडं थांबा असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गृह खात्यासंदर्भात सूचक विधान केलं आहे. तसेच डिसेंबर संपायच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. राष्ट्रवादीला सरकारमध्ये 15 मंत्रिपदं धरून 17 पदं मिळालीत. यावेळी नवीन खाती घेण्याचा प्रयत्न आहे. विकासकामे मार्गी लावण्यासाठीच अर्थ खातं राष्ट्रवादीकडे ठेवलं असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
शहरांसाठी महत्त्वाचे गृहनिर्माण आपल्याकडे घेतलं आहे. सहकार आपल्यासाठी महत्त्वाचं म्हणूनच राष्ट्रवादीकडे घेतलं आहे. थेट सरपंच निवड विकासाला अडचणीची त्यामुळे त्यात बदल होऊ शकतो अर्थात आघाडीला विश्वासात घेऊनच करणार असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS