मुंबई – शेतक-यांचा किसान मोर्चा आझाद मैदानावर दाखल झाला आहे. सहानुभुती दाखवत गिरीश महाजन यांनी या मोर्चात सहभाग घेतला होता. परंतु या मोर्चात सहभागी होणे म्हणजे गिरीश महाजन यांचा हा नौटंकीपणा होता अशी टीका अजित पवार यांनी केली आहे. तसेच आपण सरकारमध्ये आहोत, मंत्रिमंडळात आहोत, निर्णय घेणं हे आपलं काम आहे, ही गोष्ट त्यांना कळली पाहिजे. मात्र, निर्णय घ्यायचा सोडून केवळ शेतकऱ्यांविषयी सहानुभूती वाटते, हे दाखवण्यासाठी महाजन शेतकऱ्यांना भेटले. ठोस निर्णय घेऊन ते मोर्चात सहभागी झाले असते, तर एकवेळ ठीक झालं असतं मात्र, मदतीचे सोंग करून ते शेतकरी मोर्चात दाखल झाले होते. अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
दरम्यान हा मोर्चा काही एका रात्रीत निघाला नाही. सरकारला एवढेच वाटत होते तर मोर्चाची तारीख जाहीर झाली तेव्हाच त्यांनी शेतकऱ्यांशी संपर्क साधायला होता. असही अजित पवार यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत आल्यानंतर मुंबईकर आणि राजकीय पक्षांनी सकारात्मक पद्धतीने त्यांचे स्वागत केले. सरकारनेही पूर्वीच ही भूमिका घेतली असती तर आज ही वेळ ओढवली नसती, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
COMMENTS